गुहागर प्रतिनिधी:
राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृतीदिनी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे नं१ तसेच जि.प. प्राथमिक शाळा रिक्टोली-गावठण येथे शिवाज्ञा फाऊंडेशन तर्फे नवीन शैक्षणिक वर्षांनिमित्त छत्री वाटप करण्यात आले.ह्या प्रसंगी शिवाज्ञा फाऊंडेशनचे संघराज जाधव , निरंजन पाकळे,साईराज सुर्वे,ओम गंगावणे, सुश्मिता मोरे, नेहा पालशेतकर, स्नेहा मालप, अक्षता जोशी, नेहा घाडे, साक्षी मेटकरी, आदिष्टी पाकळे तसेच गावातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्री.सखाराम तिवरेकर तसेच शाळेचे शिक्षकवृंद श्री राजेश केरुशेट लकेश्री सर आणि सौ. निलम किशोर मोहिते मॅडम,(रिक्टोली-गावठण शाळा)श्री.प्रकाश रामचंद्र पेंढारकर आणि सहकारी वृंद (तिवरे शाळा )
मानसी म्हैसकर अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती सोनाली शिंदे उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती अरविंद शिंदे, मीनाक्षी शिंदे, प्रतिभा शिंदे , सिमा शिंदे उपस्थित होत्या.
महाराष्ट्रातील जनतेच्या मस्तकावर चारशे वर्षापूर्वी ज्या माऊलीने मायेचे छत्र धरले त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना आज ही छोठीशी मानवंदना देत आहोत असे ओम गंगावणे यानी नमुद करत आम्हाला ह्याकामी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे आभार व्यक्त केले.












