चिपळूण (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ आणि सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आरती निराधार सेवा फाउंडेशन, मालघर (ता. चिपळूण) येथे पार पडणार आहे.
शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार असून रक्तदाब, रक्तातील साखर (मधुमेह), वजन, स्त्रीरोग, हाडे, ईसीजी, दमा-अस्थमा, कान-नाक-घसा तसेच डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय आहाराबाबत मार्गदर्शन आणि मोफत औषध वितरणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. या उपक्रमात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रत्नागिरी श्री. दीपक घाटे, संस्था प्रतिनिधी योगेश पाटील, सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील व डॉ. प्राची पाटील, आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या अनिता आत्माराम नारकर तसेच समाजसेवक शशिकांत चव्हाण यांचे सहकार्य लाभत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९६०४०२०६३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.













