पोलिसांचा प्राथमिक अंदाज
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहराजीकच्या कुवारबाव-साईनगर येथे सूरज राजाराम झोरे (25) या तरुणाचा खून हा आर्थिक कारणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला असून संशयित तिघांना न्यायालयाने 2 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुनह्यात वापरण्यात आलेला कोयता व इतर दोन संशयितांची गुन्ह्यातील भूमिकेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
सोहम एकनाथ म्हात्रे(18,रा.शांतीनगर रसाळवाडी,रत्नागिरी),अभिषेक देवानंद राठोड(22,रा.आदिनाथ नगर झोपडपटटी,रत्नागिरी) आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (21,रा.शांतीनगर रसाळवाडी,रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. पोलिसांतर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकिल निलांजन नाचणकर यांनी काम पाहिले. खून करतानाची घटना सात बंगला येथे आलेल्या एका पाहूण्याने प्रत्यक्ष पाहिली आहे. शहर पोलिसांनी त्यांचीही जाब जबानी नोंदवली आहे.












