टीआरपी येथील आदिनाथ नगर येथे राजस्थानि कामगरागाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या टीआरपी येथील आदिनाथ नगर येथे राजस्थानि कामगरागाचा मृतदेह सापडून आला. ही घटना बुधवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास उघडकीस आली.
कैलास प्रभू सिंह (35,मुळ रा.राजस्थान सध्या रा.रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत एरंता सौदानसिंग मीना यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, केलास सिंह हा इतर तीन ते चार कामगरांसह त्यांच्या पतीकडे मार्बल बवण्याचे काम करत होता. बुधवारी सकाळी कैलासने इतर कामगारांना मी कामावर येत नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,दुपारी 3.30 वा.सुमारास आदिनाथ नगर येथील गवताळ भागात एक तरुण बेशूध्द अवस्थेत पडल्याचे एरंता मीना यांना समजले. त्यांनी त्याठिकाणी जाउन पाहिले असता त्यांना तो कैलास सिंह असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आपल्या पतीला माहिती दिल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी कैलास सिंहला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल खापरे करत आहेत.