बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात पोलिसांचे संचलन..

वेंगुर्ले : दाजी नाईक
येत्या बुधवार २७ मे रोजी मुस्लीम समाजाचा वर्षातील मोठा उत्सव बकरी ईद सण साजरा होणार आहे. हा उत्सव शांतता प्रिय वातावरणांत संपन्न व्हावा. सण कालावधीत शांतता सुव्यवस्था राखावी. मुस्लीम समाजाने तो निर्भय वातावरणांत साजरा करावा. यादृष्टीने आज वेंगुर्ले शहरातून पोलिसांनी संचलन करीत जनजागृती केली.

जिल्हा पोलीस अधिक्षक मोहन दहीकर यांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले शहर बाजारपेठ ते मुस्लीम वस्ती व मस्जिद असलेल्या भागात वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे दंगा-काबू पथकाकडे असणाऱ्या साहित्य समवेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड या अधिकाऱ्यांच्या प्रमुख सहभागांत हे संचलन केले. यामध्ये वेगुर्ले पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.