रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील वरची आळी येथील ओंकार ॲग्रोटेक या दुकानाला रविवारी सकाळी शॉटसर्किटने अचानक आग लागली. मात्र,शेजारी नागरिक आणि स्थानिक तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने खूप मोठा अनर्थ टळून लाखोंचे सामान सुरक्षित राहिले.
रविवारी सकाळी ओंकार ॲग्रोटेक या दुकानात धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे शेजारीच राहणाऱ्या एका रहिवाश्याच्या निदर्शनास आले. त्यांनी आगीवर पाणी मारुन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जवळण राहणारे निलेश मलुष्टे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या जवळील अग्निरोधक सिलेंडरचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, नगर परिषदेच्यास अग्निशमन दलाला माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू त्यापूर्वीच आग आटोक्यात आली होती.
ओंकार ॲग्रोटेक हे मोठे दुकान असून त्यात मोठ्या प्रमाणात कृषीसाठी लागणारी महागडी यंत्रसामुग्रीचा मोठा साठा होता.जर आग वेगाने पसरली असती ती ही सर्व सामुग्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखोंचे नुकसान झाले असते. मात्र मलुष्टे यांनी योग्य वेळी अग्निविरोधक सिलेंडरचा वापर केल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली













