खासदार नारायण राणे शनिवारी ३० मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

 

 

कणकवली : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नियोजित दौऱ्यानुसार खा. नारायण राणे शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून रवाना होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता मुंबई विमानतळावरून इंडिगो च्या 6E-5177 या विमानाने सायंकाळी ७.१० वाजता गोव्याकडे प्रस्थान करणार आहेत. रात्री ८.२५ वाजता गोव्यातील मोपा विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोटारीने सावंतवाडी मार्गे कणकवलीकडे रवाना होणार आहेत. तसेच रात्री १० वाजता कणकवली येथील ओम गणेश बंगलो येथे त्यांचे आगमन होणार आहे.