राजापूर अर्बन बँकेचे सौंदळ येथे ‘ग्राहक सेवा केंद्र’ कार्यान्वीत

राजापूर (प्रतिनिधी) आधुनिक बँकींग प्रणाली राबवून सर्वसामान्य ग्राहकांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवून राजापूर अर्बन बँक उत्कृष्ट बँकींग सेवा देत आहे. बुधवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. बँकेच्या पाचल शाखेअंतर्गत बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार ग्राहक सेवा केंद्राचा सौंदळ येथे शानदार शुभारंभ बँकेचे ज्येष्ठ सभासद तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मनोहर सप्रे यांचे हस्ते करण्यात आला.तर मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्वरी यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उद्घाटक मनोहर सप्रे यांनी मनोगत व्यक्त करताना आम्हा सौंदळ पंचक्रोशीतील ग्राहक, सभासदांची मागणी ही पाचल येथे बँकेची शाखा सुरु होण्यापूर्वीपासून होती ती आज किमान ग्राहक सेवासुविधा केंद्र सुरु करुन पूर्ण करण्यात आली आहे

त्याबद्दल संचालक मंडळाला धन्यवाद दिले. तर गावकार श्री. काशिनाथ पाटील यांनी बँकेने आडवली, परटवली, ओशिवळे, ताम्हाणे, तुळसवडे या पंचक्रोशीतील ग्राहकांची मागणी मान्य करुन सेवासुविधा सुरु करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, बी.ओ.एम. अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर व अध्यक्ष हनिफ काझी यांनी सौंदळ पंचक्रोशीतील ग्राहकांना तूर्तास पाचल शाखेअंतर्गत सुविधा केंद्र चालू केलेले असून याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा व बँकेला भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. तसेच भविष्यात सौंदळ येथे अधिकृत शाखा सुरु करण्यासाठी सर्वांचा पाठिंबा लाभावा, अशी आशा व्यक्त केली.

बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी, उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्यासह बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचे सदस्य जयंत अभ्यंकर, विजय पाध्ये, प्रतिभा रेडीज, संजय ओगले, अनामिका जाधव, विवेक गादीकर, अॅड. शशिकांत सुतार, दिनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, बँकेचे सहाय्यक सर व्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, ओ.एस.डी. प्रसन्न मालपेकर, लेखापाल रमेश काळे, आय. टी. प्रमुख प्रसन्न खांबे, पाचल शाखेच्या शाखाधिकारी अंकिता जायदे, राजापूर शाखेचे शाखाधिकारी रोहीत सामंत, शैलेंद्र संसारे, सौंदळ सरपंच कृष्णा जाधव, उपसरपंच फरहान खान, काशिनाथ पाटील, सईद भोगावकर, अकबर नाईक, इक्बाल टोले, याकूब खान, मुसब्बीर टोले, नजीर गुडेकर, वासुदेव घाग, मनोहर नारकर, प्रकाश तळेकर, फकीर नाईक, उमर नाईक, शमसुद्दीन नाईक, सुलेमान गोलंदाज, बाळा पाटील यांसह बाबामियाँ पिरखान आिदंची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली.
प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी तर सूत्रसंचालन प्रसन्न मालपेकर यांनी केले. आभार अॅड. शशिकांत सुतार यांनी व्यक्त केले.