राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील मिळंद गावचे सुपुत्र, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कान्होजी धोंडू मोरे वय वर्षे ९० यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे २०२६ रोजी त्यांच्या मिळंद आनंदवाडी येथील निवासस्थानी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्द जामदा विभागात शोककळा पसरली असून सर्त्रत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार शरद मोरे यांचे ते वडील होत.
सन १९६०-६५ दरम्यानच्या काळात ग्रामीण भागात कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसताना पाचल आणि जामदा विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून अतिशय प्रमाणीक व निष्ठेने काम केले. साधी राहाणी व उच्च विचारसरणी आणि एक कडक शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी त्यावेळी केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो कै. कान्होजी मोरे












