अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल : ना. नितेश राणे

रत्नागिरी :

कोकण विधान परिषद निवडणुकिचे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे रत्नागिरीत उपस्थित होते. यावेळी झालेल्या मेळाव्यात ना. राणे यांनी उपस्थितान संबोधित केले. ते म्हणाले,

आजचे महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही
कोकणातील सगळेच खेळाडू व्यासपीठावर मग लढणार कोण

जे मागे उरले आहेत त्यांच्यावर आम्ही आता दुर्बीण ठेवून लक्ष ठेवणार

ही निवडणूक म्हणजे सगळं आकड्यांचा खेळ

ही निवडणूक एकदिलाने लढवणार आहोत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , खासदार नारायण राणे यांनी तसे निर्देश दिले आहे

सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने अनिकेत तटकरे याना शुभेच्छा आणि २२ जूनच्या निकालामधे भाजपच्या सिंहाचा वाटा असेल

कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे हे योग्य उमेदवार आहे आणि चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे

अनिकेत तटकरे यापूर्वी आमदार म्हणून काम चांगले आहे. कोकण विकाससाठी त्यांची मेहनत नेहमी असते.
दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष असते, यापुढेही ते चांगले काम करतील

आम्ही महायुती आहोत तर समोर फक्त ५५ मते आहेत म्हणजे चणे कुरमुरे आहेत.

विरोधातल्या उमेदवार बाळ माने यांना आवाहन कशाला त्रास घेता, तुमचे ५५ सांभाळताना त्रास होईल

त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक घेऊ

नेहमी निवडणूक लढायची phd घायची नाही हा सल्ला

निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होणार

निवडणूक बिनविरोध होऊ शकते त्यामुळे दोन्ही वेळचे फटाके घ्या

सिंधुदुर्गमधे भाजपकडून क्लीन स्वीप मिळणार

२०१८ ला सिंधुदुर्ग ने अनिकेत तटकरे यांना जास्त मतदान केले होते,

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार राणे साहेब यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे.
आजच्या काळात ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.