लांजा तालुक्यातील वेरळ येथील घटना , घटनेनंतर आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू
लांजा (प्रतिनिधी) :पूर्वीच्या वादातून ५९ वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने हातावर आणि कपाळावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील वेरळ बस स्टॉप येथे बुधवारी ३ मे रोजी रात्री घडली . या घटनेनंतर वार करणारा व्यक्ती फरार झाला असून लांजा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद सौ. भारती प्रभाकर जाधव (वय ५२, राहणार वेळ बौद्धवाडी) यांनी केली आहे. त्यांचे पती प्रभाकर उर्फ भाई बाबू जाधव (वय ५९, राहणार वेरळ बौद्धवाडी) आणि जनार्दन गौतम जाधव (वय ३५, राहणार वेरळ बौद्धवाडी) यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहेत. बुधवार दिनांक ३ मे रोजी रात्री ७ वाजता प्रभाकर जाधव हे वेरळ बस स्टॉप या ठिकाणी टीव्ही चा रिचार्ज करण्यासाठी गेले असता जनार्दन जाधव याने पूर्वीच्या वादातून प्रभाकर ऊर्फ भाई जाधव यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्यावर कोयत्याने हात आणि कपाळावर जोरदार वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रभाकर जाधव हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रभाकर उर्फ भाई जाधव यांच्यावर कोयत्याने वार केल्यानंतर जनार्दन जाधव हा फरार झाला अजून लांजा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात जनार्दन जाधव याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम १०९(१), ३५१(२), भादविक ३०७(१), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे करत आहेत.













