श्री दत्तगुरु दर्शन मंडळाकडून सत्कार
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील जानवळे येथील स्वप्निल सुरेश बैकर याची मुंबई पोलिस दलात नुकतीच निवड झाली.त्याच्या या निवडीने त्याच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्वप्निलने अतिशय मेहनत,चिकाटी, जिद्द, याच्या जोरावर हे यश मिळवले आहे.येथील गावात गेल्या दोनतीन वर्षात पाच ते सहा जण पोलिस भरती झाले, आणि अजूनही 8 ते 10 जण प्रतीक्षेत आहेत त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात पोलिसांचा गाव म्हणूनही या गावाची ओळख निर्माण झाली आहे. गावात कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या तरुण किंवा तरुणीचा भव्य दिव्य मिरवणूक काढण्याचा निर्धार या गावात केला असून ज्यामुळे इतरांना एक नवी प्रेरणा मिळावी व प्रोत्साहन देण्याची प्रथा याठिकाणी आहे. स्वप्नीलने देखील अतिशय मेहनत, चिकाटी, जिद्द याच्या जोरावर हे यश मिळविले त्याबद्दल सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री दत्तगुरु दर्शन मंडळाच्या सदस्यांनी त्याचा यथेच्छ सत्कार केला.













