आडेली येथील तरुण बेपत्ता : वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली देऊळवाडी येथील सदानंद शांताराम बांदेकर उर्फ सदू वय ४० वर्ष हे घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले आहेत. या बाबत वेंगुर्ले पोलिस ठाण्यात नापता म्हणून नोंद करण्यात आली आहे. तरी या व्यक्ती बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वेंगुर्ले पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आडेली येथील सावळाराम शांताराम बांदेकर यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, सदानंद उर्फ सदू याचा रंग-सावळा, उंची सुमारे ५.५ फूट , अंगावर हाप खाकी टी-शर्ट व काळी फुल पॅन्ट, डोळे काळे, केस साधारण बारीक मिशी काळी बारीक आहे. सदू हा ३१ मे रोजी रात्रो ११ ते १ जून रोजी सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान आडेली येथे राहत्या घरात कुणाला काही न सांगता घरातून निघून गेला आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार करीत आहेत.