पळसंब ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :  पळसंब ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक हा केवळ एक सोहळा नसून, मुघल आणि आदिलशाहीच्या जुलमी राजवटीला शह देत स्वतंत्र ‘हिंदवी स्वराज्याची’ अधिकृत स्थापना करणारा सुवर्णक्षण होता असे यावेळी सरपंच चंद्रकांत गोलतकर म्हणाले. यावेळी पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच श्री. अविराज परब, ग्रा अधिकारी अमित कांबळी, सदस्य श्री. सत्यवान तेजम, स्मिता जुवेकर, अंगणवाडी सेविका संगिता पळसंबकर, सुचिता सावंत, कर्मचारी अमित पुजारे, शैलेंद्र अणावकर, पशु वैद्यकीय अधिकारी श्री. महेश परुळेकर, निलेश तेजम, चंद्रकांत आमडोस्कर, सतोष चव्हाण आदी उपस्थित होते. सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी गुढीचे पुजन करत छत्रपत्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सर्वांचे आभार मानण्यात आले.