पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोहिमेत सहभाग
वैभववाडी l प्रतिनिधी : मोदी सरकारची 12 वर्षे विश्वास, विकास आणि जनकल्याणाची या कार्यक्रमांतर्गत वैभववाडी भाजपच्या वतीने येथील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत परिसर स्वच्छ केला. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नका अशा सुचना पदाधिकारी यांनी प्रवाशांना दिल्या.
या मोहिमेत वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, प्राची तावडे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपसभापती साची कोलते, जि. प. सदस्य श्रावणी रावराणे, जि. प. रिद्धी सुतार, पं. स. सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, हुसेन लांजेकर, नेहा माईणकर, संजय सावंत, रोहन रावराणे, विवेक रावराणे, अतुल सरवटे, प्रकाश सावंत, विनोद रावराणे, दाजी पाटणकर, शिवाजी राणे, श्री मोहिते, रणजीत तावडे, आशिष रावराणे, प्रदीप नारकर, मनोहर फोंडके, रमेश शेळके, गणेश पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












