वनविभाग लांजा यांचे आयोजन
लांजा (प्रतिनिधी) वनविभाग लांजाच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर )लांजा येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी लांजा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर. भोसले यांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे सहाय्यक सरकारी वकील श्री.झाडे, लांजा तालुका बार असोसिएशनचे वकील राहुल देसाई, श्रीमती संपदा मुळ्ये, श्रीमती तेंडुलकर यांनीही वृक्षारोपण केले.
यावेळी वनविभाग लांजाचे वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक श्रीमती श्रावणी पवार, दिवाणी न्यायालय लांजाच्या सहाय्यक अधिक्षक सौ.अनघा शिंदे, सहाय्यक अधीक्षक (वित्त) दयानंद कांबळे, सर्व वकीलवर्ग आणि न्यायालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.












