आरोग्य मंदिर येथे एसटीची रुग्णवाहिकेला जोरदार धडक

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर येथे एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा अपघात झाला. यात जीवित हानी झाली नसली तरीही दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे

एसटी स्टँडवरून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या एसटी बसची आरोग्य मंदिर येथे रस्ता ओलांडणाऱ्या रुग्णवाहिकेला धडक बसली. ही रुग्ण वाहिका उद्यम नगर येथील रुग्णालयात रुग्ण आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला

मात्र या अपघातात एसटी बसची दर्शनी काच फुटली तर रुग्णवाहिकेचा टायर फुटला. हा अपघात शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला. यामुळे काही काळ वाहतूक खोळंबले होते