अंकुश जाधव राज्य स्तरीय “आदर्श महाराष्ट्ररत्न”पुरस्काराने सन्मानित

ओटवणे (प्रतिनिधी ) दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांना ए. डी. फौंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित या वर्षीचा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला असून, गेली कित्तेक वर्ष सामाजिक कार्य करत समाजकारणा बरोबर राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण करत समाजाच्या प्रश्नासाठी नेहमी धडपडणाऱ्या आणि आवाज उठविणाऱ्या अंकुश जाधव यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी १४ जून रोजी निर्मिती लॉन्स जुळे सोलापूर येथे होणार आहे.

अंकुश जाधव हे नाव फक्त दोडामार्ग तालुक्या पुरते मर्यादित नसून आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदराने घेतले जाते.विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आवाज उठविणारे,समाजाचं आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात.समाजाचा कुठचाही प्रश्न असो त्यात कटाक्षाने लक्ष घालत आपली राजकीय ताकद लावत तो सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरणार समाजभिमुख व्यक्तिमत्व म्हणून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.समाज कल्याण सभापती असताना त्यांनी समाजा साठी केलेलं काम अनेक योजना आपल्या समाजा पर्यंत पोचविण्यासाठी केलेली धडपड आणि प्रयत्न याही गोष्टी मुळे समाजात त्यांचे वेगळे स्थान आहे.त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असला तरी अंकुश जाधव हे नावं केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र, असो वा सांस्कृतिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रासाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे. यामुळेच त्यांना मिळालेल्या पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यांच्या या सन्मानाने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे शुभेच्छा दिल्या जात आहेत.