नेमळेतील श्री देवी सातेरी आणि श्री देव कलेश्वर मलेश्वरचे ‘आराधना’ गीत २९ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित !

स्थानिक कलाकारांना प्राधान्य देत साकार झालंय ‘आराधना’ गीत

सावंतवाडी : नेमळे ग्रामस्थ, बंधू-भगिनी आणि स्वामी माऊली प्रोडक्शन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने श्री देवी सातेरी आणि श्री देव कलेश्वर मलेश्वर यांच्या चरणी समर्पित ‘आराधना’ हे भक्तिगीत आपल्या भेटीला येत आहे . हे गीत रविवार दिनांक . २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता स्वामी माऊली प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे .या भक्तिगीताचे गीतलेखन चंद्रहास राऊळ यांनी केले असून, संगीत दिग्दर्शन राजेश नाईक यांचे आहे. सिद्धी परब आणि राजेश नाईक यांनी गीताला स्वर दिला आहे. तर मितल धुरी आणि राजेश नाईक यांनी कलाकार म्हणून सहभाग घेतला आहे.
या गीताचे रेकॉर्डिंग बांदा येथील महेंद्र मांजरेकर यांच्या आविष्कार स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. व्हिडिओ शूटिंगची जबाबदारी करण शेटकर,बिरोबा कोलपटे,मधुकर शेटकर यांनी सांभाळली असून, ड्रोन शूट साईश निर्गुण आणि गौरवी आईर यांनी केले आहे . तर विकास तर्पे हे प्रोडक्शन हेड म्हणून कार्यरत होते यात विशेष म्हणजे स्वामी माऊली प्रोडक्शन टीमने या गीताची निर्मिती केली आहे.

नेमळे परिसरातील ग्रामदैवतांप्रती असलेली श्रद्धा आणि भक्तिभाव संगीताच्या माध्यमातून व्यक्त करणारे हे गीत भाविकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता स्वामी माऊली प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवर ‘आराधना’ हे भक्तिगीत नक्की पाहावे, असे आवाहन निर्मिती टीमच्या वतीने करण्यात आले आहे.