राजापूर (प्रतिनिधी): राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारांबाहेर २०० मिटर परिसर हा नो पार्किंग झोन व खाजगी अवैध प्रवासी वाहतुक प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची धडक अंमलबजावणी आगार पातळीवर सुरू झाली असून राजापूर आगार प्रशासनानेही राजापूर पोलीसांच्या सहकार्याने अशा प्रकारे आगारापासून २०० मिटरवर असणाऱ्या खासगी वाहतुकदारांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
एस. टी. चे उत्पन्न वाढावे यासाठी परिवहन मंत्री ना. सरनाईक यांच्याकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. आता एस. टी. महामंडळांच्या आगार परिसरात २०० मिटरवर खासगी वाहनांना प्रतिबंध करण्यात येणार आहे, या परिसरात खासगी वाहनांना गाडया थांबवून प्रवाशी भरणेस अटकाव करण्यात येणार आहे. अशा प्रकारे जर का खासगी वाहन चालकांनी आगाराच्या २०० मिटर परिसरात आपल्या गाडया लावल्या तर त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात येणार आहे.
यासाठी स्थानिक पातळीवर आगार प्रशासन व पोलीस प्रशासनाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. अशा प्रकारे कारवाई व अटकाव करणेबाबत राजापूर आगार प्रशासनाकडून राजापूर पोलिस निरीक्षक यांना लेखी पत्र देण्यात आले आहे.
तर राजापूर आगार व्यवस्थापक अजितकुमार गोसराडे, सहाय्यक वाहतुक निरिक्षक अजय सिडाम, वाहतूक नियंत्रक पी. आर. इंदुलकर व व्ही, डी, जाधव मार्ग तपासणी पथक वाहतुक शाखा विभागीय कार्यालय रत्नागिरी विभाग संतोष सुर्वे , विजय खानविलकर, मंगेश कावतकर वाहतूक नियंत्रक व अन्य कर्मचारी यांचे मार्फत ही धडक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
Home महत्वाच्या बातम्या राजापुर आगाराच्या २०० मिटर परिसरात खासगी वाहने उभी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई मोहिम













