वाडा येथे अवैध खतसाठ्यावर तालुका कृषी विभागाची धाड

५७ हजाराचा अवैध सेंद्रीय खताचा साठा व वाहतुकीसाठी वापरलेला टड्ढक कृषी विभागाकडून जप्त

या कारवाईने देवगड तालुक्यत खळबळ

देवगड : प्रतिनिधी

वाडा येथे अवैध खतसाठ्यावर देवगड तालुका कृषी विभागाने धाड टाकून खत वाहतुकीसाठी वापरलेल्या टड्ढकासहीत सुमारे ५७ हजाराचा सेंद्रीय खताचा साठा जप्त केला असून खताचा साठा करत असलेले गोडावूनही सील केले आहे.कृषी विभागाने ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वा.सुमारास केली.या कारवाईने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, जिल्हा कृषी अधिक्षक qसधुदूर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय महितीवरून बुधवारी सायंकाळी ५ वा.सुमारास वाडा आंबेडकर चौक येथे गोडावूनसमोर टड्ढक उभा करून टड्ढकातील अवैध खतसाठा गोडावूनमध्ये उतरवित असताना कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून अवैध विनापरवाना वाहतुक करून साठा करीत असलेले सेंद्रीय खताच्या सुमारे ५७ हजार रूपये qकमतीच्या १०० पोती जप्त केल्या.विनापरवाना खत वाहतुकीसाठी टड्ढकही तालुका कृषी विभागाने जप्त केला असून अवैध खताचा साठा केल्याप्रकरणी वाडा येथील सत्यवान परशुराम परब याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.