निवेखुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आशा सेविका व साडवली जि. प. गटातील व हातीव पं. स. गणातील आशा सेविका यांना छत्र्या व लेखण साहित्याचे वाटप
ओझरे जि. प. गटाचे प्रमुख व आमदार शेखरजी निकम सर यांचे विश्वासू हातीव पं. स. गणाचे सदस्य मंगेश बांडागळे यांच्या सौजन्याने कार्यक्रम संपन्न
पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांनी दुरदृष्टीतून आरोग्य सेवक व आशा सेविका यांना छत्र्या व लेखण साहित्याचे केले वाटप; मंगेश बांडागळे यांचे सर्वांनी मानले आभार
देवरूख (प्रतिनिधी):
आमदार शेखरजी गोविंदराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साडवली जि. प. गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र निवे खुर्द येथे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला. ओझरे जि. प. गटाचे प्रमुख व आमदार शेखरजी निकम सर यांचे विश्वासू हातीव पं. स. गणाचे सदस्य मंगेश बांडागळे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांनी दुरदृष्टीतून उन्हा तान्हात काम करणाऱ्या आरोग्य सेवक व आशा सेविका यांना आता पावसाळ्यासाठी छत्र्या व लेखण साहित्याचे वाटप केले. याबद्दल
मंगेश बांडागळे यांचे सर्वांनी आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी प्राथमिक आरोग्य केंद्र निवेखुर्द येथील आरोग्य सेवक व आशा सेविका यांना साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी निवेखुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राला २५ खुर्च्या व टेबल तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना छत्र्या वाटप करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र निवे खु.तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी ओझरे जि.प.गटाचे प्रमुख व आमदार शेखरजी निकम सर यांचे विश्वासू हातीव पं. स. गणाचे सदस्य मंगेश बांडागळे यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून साडवली जि. प. गटातील व हातीव पं. स. गणातील आशा सेविकांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये छत्र्या व लेखण साहित्य देण्यात आले. पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांनी दुरदृष्टीतून उन्हा तान्हात काम करणाऱ्या आरोग्य सेवक व आशा सेविका यांना आता पावसाळ्यात काम करताना कोणतीही अडचण येवू म्हणून आवश्यक असणाऱ्या छत्र्या व लेखण साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुसेन बोबडे यांनी केले तर उपसभापती प्रफुल्ल बाईत, पं. स. सदस्य मंगेश बांडागळे, बाळू ढवळे, प्रवीण टक्के यांनी आपल्या मनोगतातून आशा सेविका यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख मंगेश बांडागळे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे आपल्या मनोगतात कै अजित दादा यांच्या माध्यमातून सुरू असलेली लाडकी बहीण योजना तसेच विविध योजनांमुळे आज कुटुंबाला देखील हातभार लागत आहे. आपल्या विभागातील अडचणी समस्या आमदार शेखरजी निकम सर सोडवत आहेत. आज कै.दादांच्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामांसाठी पर्यटनासाठी आरोग्यासाठी आमदार निकम साहेब भरघोस निधी आणत आहेत. दादांचे नेत्रुत्व, दूरदुष्टी आणि कार्यतपरता महाराष्ट्रासाठी सदैव प्रेरणादायी ठरली आहे.महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दादांचे योगदान अविस्मरणीय आहे.कै.दादांचे कार्य हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आमदार निकम सर यांनी अर्थ संकल्प अधिवेशनात मांडलेले मतदार संघातील अभ्यासपूर्ण प्रश्न व ठोस उपाय योजना सुचवल्या याबाबत आपल्या मनोगतातून बांडागळे यांनी माहिती दिली.
यावेळी आमदार शेखरजी निकम सर यांच्या सेवाभावी वृत्तीला साजेसा कार्यक्रम घेतल्याने मंगेश बांडागळे यांचे उपस्थितांनी आभार मानले. यावेळी संगमेश्वर तालुक्याचे उपसभापती प्रफुल्लजी बाईत, हातीव पं. स. सदस्य मंगेश बांडागळे, तालुका संघटक बाळू शेठ ढवळे, नितीन भोसले, महिला तालुकाध्यक्ष तथा कासार कोळवण सरपंच मानसी करंबेळे, ओझरे -तळवडे सरपंच प्रवीण टक्के,माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, हुसेन बोबडे, माजी बोंडये उपसरपंच अनंत जाधव, महिला संघटक पूर्वा पवार, वांझोळे सरपंच निधी पंदेरे, रामू पंदेरे, शहर सेक्रेटरी गायत्री बने मॅडम, मुरादपुर सरपंच दिक्षा बांडागळे, आंगवली सरपंच अरुणा अणेराव, महिला प्रकाश सावंत, उस्मान साटविलकर, ग्रामपंचायत सदस्य राजा भेरे, काशीराम घुग, कासार कोळवण उपसरपंच प्रकाश तोरस्कर,
अद्वैत पवार, अनिल वाजे, संतोष पंदेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.












