राजापूर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीची गौरवपुर्ण कार्याची माहिती देणारी राष्ट्र निर्मितीची तपपुर्ती पुस्तीका पत्रकारांना भेट

राजापूर प्रतिनिधी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ देशसेवा करणारे पंतप्रधान होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन २०१४ ते सन १०२६ या बारा वर्षाच्या कार्यकाळातील कार्याची गौरवपुर्ण माहिती देणाऱ्या राष्ट्र निर्मितीची तपपुर्ती या प्रदेश भाजपाने प्रकाशित केलेली पुस्तीका राजापुरातील पत्रकारांना भेट देण्यात आली. राजापूर तालुका भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हा सरचिटणीस व तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव व पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष एड. एकनाथ मोंडे यांनी गुरूवारी राजापुरात पत्रकारांना ही पुस्तीका भेट दिली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही पुस्तीका तयार करण्यात आली आहे. गेल्या बारा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध योजना आणि केलेली कामे याची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. राष्ट्र निर्मितीची तपपुर्ती ही पुस्तिका भाजपाच्या वतीने सर्वत्र दिली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे देशसेवेचे अखंड व्रत घराघरात पोहचविले जाणार आहे.
राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांसह पत्रकार राजेंद्र बाईत, प्रकाश नाचणेकर, संतोष शिंदे, राजेंद्र जोगले यांसह सर्व पत्रकारांना ही पुस्तिका भेट देण्यात आली.
याप्रसंगी महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. शीतल सुनील पटेल, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हनकर, सुधा चव्हाण, अरूणा शेवडे, संदीप तेरवणकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.