रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात खेळत असताना तोंडात पाणी गेल्यामुळे बेशूध्द पडलेल्या तरुणीचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
संध्या स्वप्निल कांबळे (24,रा.चंदूर ता.हातकणंगले,कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. संध्या कांबळे ही पर्यटनासाठी 25 मे 2026 रोजी गणपतीपुळे येथे आली होती. सकाळी 8.30 वा.सुमारास ती तेथील समुद्राच्या पाण्यात खेळत असताना समुद्राची लाट तिच्या पाठीवर जोरात आपटल्याने ती तोंडावर पडली होती. त्यावेळी तिच्या तोंडातवाटे पाणी शरीरात गेल्यामुळे ती बेशूध्द झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले होते. त्यानंतर तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी बेशूध्द अवस्थेतच कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांदरम्यान 26 मे रोजी सकाळी 9.30 वा.सुमारास तिचा मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात गुरुवार 11 जून रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Home महत्वाच्या बातम्या गणपतीपुळे येथे समुद्रात खेळत असताना बेशुद्ध पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू












