चिपळूण तालुक्यातील ९१ ग्रा.पं.साठी आरक्षण सोडत जाहीर; निवडणूक प्रक्रियेला वेग

चिपळूण (प्रतिनिधी) : तालु्यातील सन २०२४ मधील १० आणि सन २०२६ मधील ८१ अशा एकूण ९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार दि. १२ जून रोजी पार पडली. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार आणि राजकीय गटांचे लक्ष आता पुढील प्रक्रियेकडे लागले आहे.
आरक्षण सोडतीसाठी तहसिलदार कार्यालय, चिपळूण यांच्यावतीने काल विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी एकूण ४७ प्राधिकृत अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियु्ती करण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रमानुसार, प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेला (नमुना ब) जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता १७ जून २०२६ रोजी मिळणार आहे. त्यानंतर १९ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १९ जून ते २५ जून हा कालावधी निश्चित करण्यात आला असून संबंधित हरकती तहसिलदार कार्यालय, चिपळूण येथे स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून उपविभागीय अधिकारी चिपळूण हे ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे अभिप्राय सादर करणार आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) ८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळणार आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचना (नमुना अ) १० जुलै रोजी व्यापक प्रसिध्दीस देण्यात येणार असून त्यानंतर निवडणुकीच्या पुढील टप्प्यांना सुरुवात होणार आहे. चिपळूण तालु्यातील ९१ ग्रा.पं.साठी होत असलेल्या या निवडणुका ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे ठरविणाऱ्या ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे.