चिपळूण अर्बन बँक संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सारिका खेडेकर यांचा आ. शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणुकीत सौ. सारिका श्रीनाथ खेडेकर यांची संचालिका पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या आनंददायी प्रसंगी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी स्वतः सौ. खेडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आ.शेखर निकम म्हणाले की, “सौ. सारिका खेडेकर या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व अभ्यासू महिलेची बिनविरोध निवड होणे ही चिपळूणच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच चिपळूण अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी होईल.” त्यांच्या या निवडीमुळे चिपळूणच्या सहकार चळवळीत महिला नेतृत्व अधिक सक्षम झाले असून, बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ठेवीदार व व्यापाऱ्यांसाठी त्या नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी खेडेकर कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, समीर जानवलकर, रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन साडविलकर, वरुण (दादू) गुडेकर, संदीप जागुष्टे, विजय भुवड, रघुनाथ भालेकर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.