मालवणात ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

हिंदू जनजागृती समितीचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद कार्यक्रम मालवण येथे उत्साहात संपन्न झाला. राष्ट्र व धर्म कार्यात अधिवक्त्यांचे योगदान या विषयावर आयोजित या संवाद कार्यक्रमाला अधिवक्ता व राष्ट्रहिताची भावना असलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मालवण येथील हॉटेल विसावा, रेवतळे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदू जनजागृती समितीचे श्री राजेंद्र पाटील, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सद्गुरू सत्यवान कदम व हिंदूजनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्र व धर्मरक्षणाच्या कार्यात अधिवक्त्यांची भूमिका, कायदेशीर लढ्यांचे महत्त्व, तसेच सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर जागरूक सहभागाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी विविध विषयांवर संवाद साधत राष्ट्रहिताच्या कार्यात अधिक सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ॲड.समीर गवाणकर, ॲड. हेमेंद्र गोवेकर, ॲड. गिरीश गिरकर, ॲड.दिलीप ठाकूर, ॲड. बांदेकर, ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, ॲड.प्रथमेश सामंत, ॲड. पलाश चव्हाण, ॲड. अक्षय पवार वं अन्य उपस्थित होते.