सुकळवाड पाताडेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत काढला विहिरीतील गाळ
मसुरे | झुंजार पेडणेकर बदलत्या ऋतुचक्रामुळे आणि वाढत्या उन्हामुळे खालावणाऱ्या पाणीपातळीची समस्या सोडवण्यासाठी सुकळवाड पाताडेवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत एकजुटीने व अंगमेहनतीने सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम श्रमदानाने पूर्ण केले. यावेळी अनिल पाताडे, अजिंक्य पाताडे, भूषण पाताडे, उमेश पाताडे, संदीप धामापूरकर, शरद पाताडे, अशोक पाताडे, तुषार पाताडे, विरेंद्र पाताडे, सुभाष धामापूरकर, श्रेयश पाताडे, इंद्रजीत पाताडे, हेमंतकुमार पाताडे,काशिनाथ पाताडे, नितीन पाताडे, प्रसाद प्रभाकर पाताडे, ग्रामपंचायत सदस्य किरण पाताडे, ग्राप कर्मचारी अक्षय पाताडे, ग्राम रोजगार सहाय्यक प्रदीप पाताडे यांचे विशेष सहकार्य लाभले. विहिरीच्या पाण्याची साठवणूक क्षमता वाढण्यासाठी, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वाडीतील गावकऱ्यांनी एकत्र येत शारीरिक श्रमदानातून केलेल्या अंगमेहनतीचे सुकळवाड गावचे प्र.सरपंच श्री.किशोर पेडणेकर यांनी कौतुक केले. श्रमदानातून गावकऱ्यांमधील एकोपा वाढीस लागून सामूहिक कामाची ताकद स्पष्ट होत असल्याचे सांगितले.













