मसुरे | झुंजार पेडणेकर
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ येथे शाळा प्रवेशोत्सव मुलांच्या उपस्थित रॅली काढत उत्साहात करण्यात आला .
शिक्षिका सौ. नेहा गवाणकर यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर विद्येची देवता श्री .सरस्वती मातेला पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. सौ नमिता सावंत यांनी गोड खिरीचे वाटप विध्यार्थी व मान्यवर उपस्थित यांना केले.
त्यानंतर सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर यांनी शाळेच्या प्रगती साठी उज्वल भविष्यासाठी पळसंब रहिवाशी व आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक श्रीं. विनोद कदम यांनी शाळेची प्रगती दर्जा टिकवून ठेवू व मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मैदानी खेळात जिल्हास्तरापर्यत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले .
तसेच उपसरंपच श्रीं अविराज परब यांनी मुलांचे पालकांचे अभिनंदन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले.
मुख्याध्यापक श्री. विनोद कदम सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
त्यावेळी शाळा अध्यक्ष रविकांत सावंत, शिक्षिका नेहा गवाणकर, पल्लवी सोनगडे, श्री. रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे, रामकृष्ण पुजारे, पोलीस पाटील अनुष्का परब, पुनम गोलतकर, स्मिता जुवेकर, निकिता सावंत, मयुरी परब, जानव्ही साईल, पाताडे, संजना परब, नारायण सावंत, राऊत मॅडम, सावंत पालक मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते .













