वडद नंबर १ शाळेत जि.प. सदस्य प्रमोद गांधी यांच्या हस्ते 35 विद्यार्थ्यांना ‘नवोदय प्रवेश किट’ वाटप

गुहागर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद नंबर १ येथे शालेय शिक्षण विभागाचा ‘प्रवेशोत्सव 2026’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शृंगारतळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या हस्ते इयत्ता 1 ली मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या 4 विद्यार्थ्यांसह इयत्ता 2 री ते 7वी पर्यंतच्या सर्व 35 विद्यार्थ्यांना ‘नवोदय प्रवेश किट’ चे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये इयत्तानुसार दर्जेदार दप्तर, स्टील वॉटर बॉटल, वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या, कंपास पेटी, पट्टी, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर, रंगपेटी व स्वच्छता साहित्याचा समावेश आहे. “वडद गावातील कोणतेही मूल शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा माझा निर्धार आहे,” असे प्रतिपादन यावेळी जि.प. सदस्य प्रमोद सिताराम गांधी यांनी केले. तसेच शाळेला येत्या 3 महिन्यात CSR निधीतून डिजिटल बोर्ड व संगणक संच, स्मार्ट टीव्ही , कॅमेरा , कपाट , इंनवर्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताराम मुरमुरे होते. यावेळी मुख्याध्यापक शहाजी लेंडे, शिक्षक बाळासाहेब जाधव, आशुतोष चितळे, केंद्रप्रमुख वैभव पवार, सरपंच कोमल मुरमुरे, उपसरपंच संदीप धनावडे, मनसेचे उपतालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव, अमित खांडेकर, वडद शाखा अध्यक्ष प्राणेश पिंपळकर, मुंढर शाखा अध्यक्ष सुजीत गांधी, सांस्कृतिक अध्यक्ष राहुल जाधव, महाराष्ट्र सैनिक रसिक पाटणकर, अनुज भुवड, ग्राम पंचायत सदस्य आरोही राजेश डाफले, वैष्णवी विक्रांत साठले , पोलीस पाटील चारूता सोमण, अंगणवाडी सेविका वनिता टेरवकर , वडद शाळा नंबर २ च्या उपाध्यक्ष सलोनी टेरवकर तसेच वडद गावचे महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार आशुतोष चितळे यांनी मानले.