श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप येथे सीएनजी पंप सुविधा सुरु
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीएनजी (CNG) पंपचा शुभारंभ सोमवार 15 जून रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक सरदार पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला.
मालवणात सीएनजी वाहनांची संख्या वाढत होती. मात्र याठिकाणी सीएनजी पंप नसल्याने वाहन चालकांना ओरोस अथवा कुडाळ येथे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मालवणातील सीएनजी धारक असेच रिक्षा व्यावसायिक यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन मालवणात सीएनजी पंप सुरु व्हावा याबाबत मागणी केली होती. सीएनजी पंप ची गरज व त्याबाबत मागणी पाठपुराव्यातून मालवण शहरातील श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप येथे सीएनजी पंप सुविधा सुरु झाली आहे. प्रामुख्याने सीएनजी धारक रिक्षा व्यावसायिक, अन्य वाहने, पर्यंटकांची वाहने यांना फायदा होणार आहे. मालवणात सीएनजी पंप सुरु झाल्या बाबत सीएनजी धारक यांच्या वतीने रिक्षा व्यावसायिक निलेश लुडबे व अन्य वाहन चालकांनी आभार व्यक्त केले आहेत.
श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप
येथे सीएनजी पंप शुभारंभ प्रसंगी तसेच भारत पेट्रोलियम अधिकारी सौ. रुपाली बर्वे, सेल्स ऑफिसर अरविंद सिंग, इंजिनियरिंग ऑफिसर
आकाश श्रीवास्तव, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे उपव्यवस्थापक आकाश शिंदे, दत्तात्रय शिरसाठ, राहुल कुलपे, सहाय्यक व्यवस्थापक दिव्यांशू यांसह श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप व्यवस्थापक रवी मालवणकर, आंनद वराडकर, मंदार गांवकर, राहुल वीर, तेजस राणे, महादेव चव्हाण, राकेश बगाड, अमित खांदारे, अश्विन गांवकर, रोहन चव्हाण उपस्थित होते. तसेच सीएनजी धारक, रिक्षा व्यावसायिक यांचीही मोठी उपस्थिती यावेळी होती.












