बीड : अहिल्यानगर–अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातील नेकनूर गावाजवळ स्कॉर्पिओ आणि पिकअप वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पिओच्या धडकेनंतर पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला तब्बल 20 ते 25 फूट दूर जाऊन पडले. या संपूर्ण अपघाताचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, वाहनांवरील नियंत्रण सुटणे, रस्त्यांवरील धोकादायक जंपिंग पॉइंट्स आणि ब्लॅक स्पॉट्स यांमुळे बीड जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.











