महायुतीकडून कार्यक्रमाची जंगी तयारी…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या १९,२० जूनला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक भाजपा जिल्हा कार्यालयात पार पडली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.या बैठकीत सभेचे नियोजन, कार्यकर्त्यांची उपस्थिती, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा,तसेच विविध विभागाचे समन्वय याबाबत सविस्तर चर्चा झाली.
इचलकरंजी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या नामकरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र हा राज्यातील प्रमुख साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. देशाच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे साखर उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा आहे.
दौऱ्यादरम्यान हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याचे नामांतर करून त्याला माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नाव देण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित आहे. अलीकडेच आवाडे कुटुंबीयांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कारखान्याचे नाव बदलून “कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखाना” असे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अंबाबाई मंदिरात भाविकांना सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करण्याचे सूचना केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,आमदार राहुल आवडे यांनी सहकार, बँकिंग आणि साखर उद्योगाचे संबंधित विविध घटना बाबत चर्चा करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या बैठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोक माने, चंद्रदीप नरके,प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम,संजय पाटील,विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील संगीता कदम
महेश जाधव, सुजित चव्हाण,अंबरीश घाटगे, मुरलीधर जाधव, राहुल चिकोडे, शिल्पा खोत, अक्षय जाधव, भूषण पाटील, विशाल शिराळे,संजय पाटील, स्वाती पाटील, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम,कौसर बागवान, अनिल डाळ्या आदी उपस्थित होते.













