मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी नूतन इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

मालवण | प्रतिनिधी : ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामस्थ यांसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मठबुद्रुक या संस्थेच्या नूतन इमारत भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते हा दिमाखदार भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

मठबुद्रुक सारख्या ग्रामीण भागात सातत्याने चांगले काम करणाऱ्या या संस्थेच्या कामाचे कौतुक करत नूतन इमारत बांधकामासाठी बँकेच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य सदैव राहील. अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डान्टस, समिर सावंत, संदीप (बाबा) परब, श्रावण सोसायटी अध्यक्ष कमलाकांत कुबल, सुनिल मरळकर, पस सदस्या सीमा परुळेकर, बुधवळे सरपंच संतोष पानवलकर, मठबुद्रुक सरपंच मोहन वेंगुर्लेकर, निरोम सरपंच बाबाजी (राजू) राऊत, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, तसेच गोठणे विकास संस्थेचे अध्यक्ष घनश्याम चव्हाण, किर्लोस विकास संस्थेचे अध्यक्ष स्वानंद भावे, असरोंडी विकास संस्थेचे अध्यक्ष दिलिप घाडीगावकर, मठबुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन जनार्दन रामचंद्र घाडीगावकर, दिपक सोनु सावंत आणि अशोक शशिकांत कांदळकर, गुरुदेव केळुसकर, जनार्दन सावंत, मारुती घाडीगावकर, निलेश बाईत, संतोष बाईत, श्रीराम पाटील, अनंत पानवलकर, मठबुद्रुक पोलिस पाटील सूर्यकांत घाडी, सत्वशील परब, शरद घाडीगांवकर, उदय सावंत, प्रमोद कदम, संदीप बुधवळेकर, प्रल्हाद राऊत, सिद्धेश राऊत, संतोष घाडीगावकर, मठबुद्रुक माजी सरपंच अक्षता बोंबळकर, किर्लोस ग्रापं सदस्य मानसी भावे, मठबुद्रुक वि.का.संस्था माजी सदस्य मनोज राऊत, किर्लोस ग्रा.प.सदस्य प्रवीण घाडीगावकर, मठबुद्रुक ग्रा. प. सदस्य विद्या मेस्त्री, अशोक कदम, संतोष घाडी, दया हाटले, अशोक घाडीगावकर, विलास घाडीगांवकर, ॲड. सुधाकर परब, रवींद्र घाडीगांवकर, मधुकर पेडणेकर, दिलीप नार्वेकर, तुळशीदास नार्वेकर तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

मठबुद्रुक सोसायटी संचालक मंडळ

मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सतिश ऊर्फ राजू परुळेकर, उपाध्यक्ष भानुदास येरम, सेक्रेटरी विश्राम कदम, संचालक जनार्दन सावंत, अशोक कांदळकर, भानुदास गायकवाड, उमाजी मालप, बाबुराव जंगले, विठोबा बागवे, कृष्णा घाडी, सुनिता बागवे, सावित्री कांदळकर, सुभाष मांजरेकर, महादेव पाताडे, सोनु जंगले, कमलेश घाडीगावकर, कर्मचारी सौ. निकिता चव्हाण यांसह सहकारी उपस्थित होते.

अधिक सेवासुविधा निर्माण करणार : राजू परुळेकर

नूतन सुसज्ज इमारतीच्या उभारणीमुळे मठबुद्रुक आणि परिसरातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्नाशील असल्याचे अध्यक्ष सतीश (राजू) परुळेकर यांनी सांगितले.