राजापूर नगरपरिषदेचा कंत्राटदाराला दणका: रस्त्यावर पाणी न मारल्याने नोटीस

राजापूर । प्रतिनिधी- राजापूर शहरातील प्रभाग क्र. 1 मधील भटाळी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर ‘क्युरिंग’ म्हणजे पाणी न मारल्याने राजापूर नगरपरिषदेने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे.

16 जून 2026 रोजी दिलेल्या नोटीस क्र. 1 मध्ये नगरपरिषदेने साईनगर, राजापूर येथील नासिर हसन मुजावर यांना बजावले आहे. 17 मार्च 2026 च्या कार्यारंभ आदेशानुसार हे काम पूर्ण झाले आहे. मात्र, तपासणीत काँक्रिटवर अद्याप पाणी मारण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले.

नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार, काँक्रिटचा रस्ता मजबूत होण्यासाठी आणि त्याला तडे जाऊ नयेत यासाठी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी मारणे बंधनकारक आहे. याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने पत्राची दखल घेऊन रस्त्यावर त्वरित पाणी मारण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, जोपर्यंत क्युरिंगची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटदाराचे कोणतेही देयक अदा केले जाणार नाही, असे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गुणवत्तेच्या कामाबत नगरपरिषदेची ही भूमिका स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.