सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव ‘सीईटी सेल’ विद्यार्थी सहायता केंद्र

विद्यार्थी-पालकांचा वेळ अन् पैसा वाचणार! एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एफसी केंद्र (FC Centre)) सुरू!

कणकवली येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात केंद्राचे (FC थाटात उद्घाटन

कणकवली : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचे (FC Centre) उद्घाटन प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर यांच्या हस्ते सोमवारी उत्साहात पार पडले. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (DTE) मान्यतेने सुरू झालेल्या या केंद्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह जवळपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती व समुपदेशनाची सुविधा आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. सीईटी सेलचे विद्यार्थी सहायता केंद्र हे सिंधुदुर्गातील एकमेव सहायता केंद्र असून ते एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनबाबतच्या सगळ्या शंका व त्यांचे निरसन एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच होणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांचा वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व त्रुटीमुक्त होण्यास मदत होईल.

 

याप्रसंगी प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर म्हणाले, “गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. एफसी केंद्राच्या माध्यमातून एकही पात्र विद्यार्थी केवळ प्रक्रियेमुळे प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ.” प्रवेशासंबंधी माहिती व शंकानिरसनासाठी प्रवेश प्रमुख श्री. सचिन मेस्त्री – ७५८८५०५२८५ आणि श्री. इम्रान पटेल – ९७३०८०२०४६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. एफसी केंद्र डीटीईच्या वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कार्यरत राहणार आहे.