खेड शहराला पाणीपुरवठा लाईनची गळती दुरुस्त; हजारो लिटर पाण्याची नासाडी रोखली

सतीश उर्फ पप्पू चिकणे यांचा पुढाकार

खेड (प्रतिनिधी) : खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील गंभीर गळतीची दुरुस्ती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्या पुढाकाराने आज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. नर्सरी परिसरातील मेन एअर व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत होते, तर स्वरूपनगर येथील पाईपलाईनच्या जॉईंटमधूनही सतत गळती सुरू होती. या दोन्ही ठिकाणांवरील बिघाडामुळे दर तासाला हजारो लिटर पाणी वाया जात होते.

पाणीपुरवठा व्यवस्थेतील या गंभीर समस्येची दखल घेत सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी तातडीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून दुरुस्तीचे काम हाती घेतले. योग्य नियोजन आणि तांत्रिक पथकाच्या सहकार्याने दोन्ही ठिकाणांवरील गळती यशस्वीपणे बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी थांबली असून पाणीपुरवठा व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

या दुरुस्तीमुळे शहरातील नागरिकांना अधिक नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असल्याने तिची बचत आणि पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल याला नगरपरिषदेकडून प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कामात अभियंता लोहार, प्रणित जाधव, लाईन सुपरवायझर राजेश खेडेकर, सुशील महाडिक तसेच प्लंबर मुकेश पेवेकर, सुयोग, निखिल, संजय, वनगुले आणि खातू यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे हे महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण होऊन खेड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील मोठी समस्या मार्गी लागली आहे.