विद्यार्थ्यांना उष्माघात,निर्जलीकरणाचा मोठा धोका
गौरव पोंक्षे माखजन:
अल निनो च्या प्रभावामुळे वाढलेले तापमान आणि उष्मघाताचा धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्गात शाळांचे नियमित कामकाज सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते ११.१५ अशा कालावधीत घेण्याचा आदेश निघाला आहे.१९ ते ३० जून पर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचे आदेश निघाले आहेत.परंतु नैसर्गिक परिस्थिती रत्नागिरीत सारखी असूनही अद्याप रत्नागिरी जिल्ह्यासाठी असा निर्णय घेण्यात आलेला नाही.या निर्णयाची खर तर विद्यार्थी व पालक प्रतिक्षा करत् आहेत.
मान्सून, सिंधुदुर्गानंतरच रत्नागिरीत दाखल होतो.खर तर सिंधुदुर्गाप्रमाणे रत्नागिरीत देखील शाळांच्या वेळेत तातडीने बदल होणे गरजेचे आहे.बाहेर रणरणते ऊन,अंगाची लाही लाही यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे देखील जिकिरीचे हित आहे.वाढलेल्या तापमाणामुळे उष्मघात,निर्जलीकरण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवल्यास जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.संभाव्य धोका लक्ष्यात् घेऊन सिंधुदुर्ग चे प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमदी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबूडकर यांनी संयुक्त पत्र काढून जिल्ह्यातील,जिल्हा परिषदेच्या शाळा सरसकट सकाळच्या सत्रात केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेच्या आणि माध्यमिक,उच्चं माध्यमिक शाळा तातडीने, सरसकट सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.












