SARATA | महायुतीच्या विजयाबाबत धैर्यशील कदम यांचा विश्वास; साताऱ्यात मोठ्या मताधिक्याचा दावा

सातारा – सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. साताऱ्यातील सर्वात मोठ्या मतदान केंद्रावर १५४ मतदार असून, महायुतीचे नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी मोठा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कदम म्हणाले, “मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि सर्व नेतेमंडळींनी मला भरभरून साथ दिली आहे. हे साताऱ्यातील सर्वात मोठे मतदान केंद्र असून आदरणीय उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य तसेच सातारा आणि मेढा नगरपालिकेचे नगरसेवक मतदानासाठी उपस्थित आहेत.” “महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, याबाबत कोणतीही शंका नाही. सर्व मतदार, महाराज साहेब आणि नेतेमंडळींचे मी मनःपूर्वक आभार मानतो,” असेही धैर्यशील कदम यांनी सांगितले.