शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून व्यावसायिक शेती करावी! सरपंच चंद्रकांत गोलतकर

पळसंब ग्रामपंचायतीच्या वतीने सेलम हळद बियाणे वाटप

मसुरे | झुंजार पेडणेकर आपल्या पळसंब गावातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आता आधुनिक आणि नगदी पिकांकडे वळावा या उद्देशाने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आजच्या काळात केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर काळाची पाऊले ओळखून व्यावसायिक शेती करणे गरजेचे आहे. सेलम हळद हे बाजारात अत्यंत चांगला नफा मिळवून देणारे पीक असून, आपल्या भागातील हवामान आणि जमिनीसाठी ते अत्यंत पूरक आहे असे प्रतिपादन सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी येथे केले. पळसंब ग्रामपंचायतच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत हळद बियाणे वाटप करण्यात आले त्यावेळी बोलत होते.

पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी दापोली कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधत मुळदे कृषि विदयालय यांच्या वतीने शेतकऱ्याना सेलम हळद बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. चंद्रकांत गोलतकर यांचे घरी गावातील शेतकरी वर्गाला

हळद लागवड करण्यासाठी मोफत हळद बियाणे वाटप करताना ग्रामपंचायत पळसंबचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच श्री. अविराज परब, पंचायत समिती मालवणचे कृषी विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अमित कांबळी, श्री. सत्यवान तेजम, स्मिता लक्ष्मण जुवेकर, ऋतुजा सावंत प्रमोद सावंत, रमेश परब अशोक जुवेकर, मधुकर जोईल, पुरुषोत्तम साईल,

जयेंद्र परब, मोहन आपकर, मेघशाम जुवेकर, गणेश पुजारे, राजन पुजारे, साहेब तसेच गावातील शेतकरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होते यावेळी व्ही. के. जाधव यांनी हळद लागवडी बाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी हळद बियाणे बाबत आभार मानले.