सावंतवाडी पर्यटन केंद्रातील कॉम्प्रेसर चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक; गुन्ह्यात वापरलेली कार जप्त

​सावंतवाडी:
येथील नगरपरिषद गार्डन जवळील पर्यटन केंद्रातील कॉम्प्रेसर चोरी प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोघांना आज पहाटे अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायमूर्ती कोठडी (मॅजिस्ट्रेट कस्टडी) सुनावण्यात आली, ज्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

​याप्रकरणी सावंतवाडी नगरपरिषदेचे अधिकारी गोविंद अशोक गवंडे (वय ३८, रा. खास्कीलवाडा, सावंतवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली.

​पोलिसांनी या चोरीप्रकरणी १) उमेश केशव नाईक (वय ३१, रा. माणगाव, ता. कुडाळ) आणि २) सोहम मुकुंद पिळणकर (वय १९, रा. साळईवाडा, सावंतवाडी) या दोघांना आज पहाटे ताब्यात घेतले. संशयितांकडून चोरीला गेलेला कॉम्प्रेसर आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली हुंडाई वेरना कार (क्रमांक GA-08-F-9576) जप्त करण्यात आली आहे.

​दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायमूर्ती कोठडी मंजूर केली. तदनंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.