कचऱ्याला आग.. देवगड शहरात धुराचे लोट

देवगड / प्रतिनिधी

 

देवगड किल्ला येथील मुस्लिमवाडीनजीक कड्याकपारीच्या परिसरात सुमारे ५० फूट खोल असलेल्या दरीत भागात साठलेल्या कचऱ्याला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली आहे. ही आग वाऱ्यामुळे वाढत असून आगीच्या धुराचे लोळ हवेत दिसून येत आहेत. हा परिसर निर्मनुष्य व वस्तीपासून दूर आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार व प्रवीण सावंत यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. आग परिसरात पसरू नये, यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह संबंधित प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्क आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.