रत्नागिरीत गोवांशीय मांस आढळून आल्याने रत्नागिरीत हिंदू संघटना आक्रमक

आतापर्यंत 4 वेळा अशा घटना घडल्याने मोठे आंदोलन करण्याचा इशारा 
सोमवारी पतितपावन मंदिरात महत्वाची बैठक 

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळ फणसवळे येथे चार ते पाच गोवंशय जनावरांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. हे अवयव प्लास्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून या गोवंशांना मारून त्यांचे कातडे निर्दयीपणे काढण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरीही आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहे

रत्नागिरी शहरात आतापर्यंत 4 वेळा गोवंशिय प्राण्यांचे अवयव आणि मांस सापडून आलेले आहे. 2024 मध्ये हिंदू संघटनाकडून या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. परंतु पोलीस प्रशासनाकडून त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळेच यातील सूत्रधार आणि त्यांचे हस्तक मोकाट सुटले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन काय करते हा प्रश्न हिंदू संघटनाना पडलेला आहे. गोमाता आमचा आस्थेचा विषय असून कोणी त्याच्याशी खिलवाड करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत दीड टन गोमांस सापडल्याच्या अनुषंगाने पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवार दिनांक 22 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी शहरातील पतीत पावन मंदिर येथे हिंदुत्ववादी संघटना आणि बांधवांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून येथे पुढील नियोजन ठरवण्यात येणार आहे