इलेक्ट्रिकल विभागाची शंभर टक्के कामगिरी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पदविका अभियांत्रिकी निकाल जाहीर
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील एकूण २६१ पैकी २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाने ९६.१७ टक्के निकालाची नेत्रदीपक नोंद केली आहे.
या परीक्षेत महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने १०० टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी केली असून विभागातील सर्व ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विभागात पारस गंगाराम मेस्त्री (९१.२८ टक्के) याने प्रथम, नमिता सुभाष मोरजकर (८८.१७ टक्के) हिने द्वितीय तर जयराम रघुनाथ सापळे (८७.७८ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळवला.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ९८.१३ टक्के लागला असून ५५ पैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागात साहिल विनोद देसाई (८८.३९ टक्के) प्रथम, मकरंद भारमानी तिरवीर (८७.११ टक्के) द्वितीय आणि प्रथमेश गोपाळ कणेरकर (८५.१७ टक्के) तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात १३१ पैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विभागाचा निकाल ९४.६५ टक्के लागला आहे. विभागात विधी विक्रम कोटणीस (९४.२४ टक्के) हिने प्रथम, मैथिली सतीश पाथरूट (९२ टक्के) हिने द्वितीय तर उर्वी विजय आंदुर्लेकर, निशांत नारायण जाधव आणि नंदिनी संजीवकुमार सिंग (९१.४७ टक्के) यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल ९२.३० टक्के लागला असून २६ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागात तनिष्का गुरुदास गवस (८६.६१ टक्के) प्रथम, आयुष विशाल नार्वेकर (८६.५० टक्के) द्वितीय आणि औधव विलास भिके (८६.०० टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय आणि घवघवीत यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे जाहीर अभिनंदन केले आहे. पदविका अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा कायम राखत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने जिल्ह्यात पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची ही यशस्वी वाटचाल यापुढेही अशीच अविरत सुरू राहणार असल्याचा विश्वास उपप्राचार्य गजानन भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.












