मालवण भाजपा कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मालवण | प्रतिनिधी : मालवण भाजपा कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिक्षिका मरीना फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनात योगासन, सुर्यनमस्कार आणि प्राणायाम प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.

 

यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा महिला शहराध्यक्षा तथा नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती सौं. अन्वेषा आचरेकर, नगरसेवक रविकिरण तोरसकर, नगरसेवक ललित चव्हाण, पुजा वेरलकर, महिमा मयेकर, अमृता फाटक यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.