शरीर, मन आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन राखण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त- प्रशांत यादव

चिपळूण (प्रतिनिधी): योगाची परंपरा हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिली आहे. वेद, उपनिषदे आणि महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रांमधून योगाचे तत्त्वज्ञान जगासमोर आले आहे. तसेच योग आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधण्याची शिकवण देतो. शरीर, मन आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन राखण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो, असे रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह येथे आयोजित योगाभ्यास शिबिराप्रसंगी आपले मत मांडले

यावेळी हास्य योग क्लबच्या कल्पना प्रभुदेसाई, स्मिता गांधी आणि विभावरी वाडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, भाजपचे जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, नगरसेविका वैशाली निमकर, जिल्हा सदस्य स्वाती देवळेकर, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा आदिती गुडेकर, शहर सरचिटणीस सारिका भावे, मधुकर निमकर, राकेश दाते, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष फैसल पिलपिले, प्रा.डॉ.मिनल ओक, वीणा जावकर, राधिका पाथरे, तृप्ती यादव, डॉ.शमिना परकार, रविना गुजर, मनाली रेडीज, मनाली जाधव, मंजुषा काणे, दीपमाला नाटुस्कर, राधा फाळके डॉ.सविता दाभाडे, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे यांच्यासह शहर आणि परिसरातील योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.