पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने सामाजिक सेवाकार्य
मालवण | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेनेच्या वतीने सामाजिक सेवा भावानेतून फातिमा कॉन्व्हेन्ट येथे अन्नधान्य व खाऊ वितरण करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिडये यांसह मालवण नगरपरिषद लोकप्रतिनिधी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक ललित चव्हाण, मयु पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितानी फातिमा कॉन्व्हेंट संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला पाहिजे या भावानेतून आयोजित हा उपक्रम खऱ्या अर्थाने सेवाकार्य ठरला.












