देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) तर्फे Skill Development Catalyst (SDC) – Business Development Executive (BDE) या पदासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरह्व्युचे(प्रथम फेरी) आयोजन गुरुवार दि. २५ जून, २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता करण्यात आले आहे.
एमकेसीएलच्या कौशल्य विकास व रोजगाराभिमुख उपक्रमांतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील तरुण पदवीधरांना रोजगार व करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना Business Development Executive (BDE) या भूमिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. या पदाअंतर्गत विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन, शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती देणे, नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी मदत करणे, शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधणे, मार्केटिंग व जनजागृती उपक्रम राबविणे तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सहभाग घेणे अशा विविध जबाबदाऱ्या असणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असून सन २०२३, २०२४, २०२५ किंवा २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
या पदासाठी उत्कृष्ट संवाद कौशल्य, संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना अद्ययावत रिझ्युम, आधार कार्डची प्रत, शैक्षणिक गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. सदर दिवशी इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११:०० वा. वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमकेसीएल कोकण विभाग समन्वयक श्री. संतोष कोलते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कोलते(9890414170), उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील(9096229741) आणि प्रा. डॉ. मंदार जाखी(9420473671) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.













