कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ४ जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल गुणगौरव कार्यक्रम ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती कणकवली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 

यावेळी पत्रकार पाल्यांना प्रमाणपत्र , भेटवस्तु देवून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव केला जाणार आहे. तरी सर्व पत्रकार सभासदांच्या गुणवंत पत्रकार पाल्यांनी व पालकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे यांनी केले आहे.