शिवसेना महिला सेना कुडाळ मालवण ‘तालुका प्रभारी’ पदी सौ. पुनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी दिले नियुक्ती पत्र

पुनम चव्हाण यांच्याकडे पक्षाने सोपवली आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना सिंधुदुर्ग महिला सेनेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण येथील युवा डॅशिंग नेतृत्व नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम नागेश चव्हाण यांची शिवसेना महिला सेना कुडाळ, मालवण तालुका प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.

वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, जिप सदस्या अक्षता गावडे, चित्रा हरमलकर, विद्या फर्नांडिस, सौ. स्मिता प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी हडकर आदी उपस्थित होत्या.